अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:26 PM2019-06-03T16:26:57+5:302019-06-03T16:28:32+5:30

अभिनय कट्टा नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ.इथे कलाकारांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळतोच सोबत माणूस म्हणून कलाकार जास्तीत जास्त प्रगल्भ होतो.

'Baljhumbad': 'Shubham Karoti Say' presented by child artist | अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' 

अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' 

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड'बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' शाळा बालकलाकारांची म्हणजे एक आगळावेगळा समर कॅम्प

ठाणे :  बालकलाकारांसाठी अभिनय कट्ट्यावर विशेष बालसंस्कारशास्त्र हा विशेष उपक्रम राबविला जातो.त्यात अभिनय,नृत्य,संगीत,निसर्ग,खेळ,अभ्यास,योग असे विविध संस्कार बालकलाकारांवर केले जातात.मे महिन्याच्या सुट्टीचा योग्य विनियोग करण्यासाठी ठाणे व मुंबईतील बालकलाकारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होती ती म्हणजे अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली *'शाळा बालकलाकारांची'.* 

        शाळा बालकलाकारांची म्हणजे एक आगळावेगळा समर कॅम्प जिथे मुलांच्या अभिनय नृत्य ह्या शाळेत कलागुणांसोबत किल्ल्याचं महत्व,मैदानी खेळ,बौद्धिक खेळ,खेळ भातुकलीचा,नाटक आणि मराठी साहित्याच महत्व आशा विविध विषय मनोरंजक रित्या शिकवण्यात आल्या.पहिल्या वर्गाच्या यशस्वी पुर्ततेनंतर लोकाग्रहास्तव दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.अभिनय कट्ट्याच्या शाळा बालकलाकारांची च्या दुसऱ्या वर्गातील बालकलाकारांनी अभिनय कट्टा क्रमांक ४३१ वर 'बालझुंबड' सादर करून धम्माल उडवली.  बालझुंबड चे विशेष आकर्षण होते ते अभिनय कट्टा संस्थापक अध्यक्ष किरण नाकती लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य 'शुभम करोती म्हणा'.* *पाश्चात्य संस्कृतीकडे झुकणाऱ्या लहान तसेच तरुणपिढीला आपल्या संस्कृतीची खरी ओळख करून देने म्हणजे 'शुभम करोती म्हणा' बालनाट्य.* *शाळेतील स्नेहसंमेलनात इंग्रजी गाण्यावर थिरकणाऱ्या बच्चेकंपनीना शाळेतील शिक्षक मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम करायला लावतात.* *त्यातूनच मुलांना आपल्या संस्कृतीचा इतिहास समजून येतो.* *सदर बालनाट्यात शर्वरी पंच,ऋषिकेश काटे,अमेय कुलकर्णी , आरोही खानखोजे ह्यांनी विद्यार्थ्यांची; श्लोक  पंच ,पार्थिवी भागवत,परी थोरात,लानी थोरात ह्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली.*

*मनन मादुसकर व समृद्धी सावंत ह्यांनी शेतकरी,मन्सव मादुसकर ह्यांने लोकमान्य टिळक,स्वरा जोशी हिने सावित्रीबाई फुले,यशिका चौहान हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांची भूमिका साकारली.सादर बालनाट्याचे संगीत श्रेयस साळुंके आणि प्रकाशयोजना वैभव चौधरी ह्यांनी केले.

      मराठी साहित्य संवर्धनासाठी शालेय पाठयपुस्तकातील कविता व धड्यांचे वाचन 'शाळा बालकलाकारांची' मधील महत्वाचा उपक्रम होता. *शर्वरी पंच हिने 'सत्यम शिवम सुंदरम', परी थोरात हिने 'प्रश्न', आरोही खानखोजे हिने 'डराव डराव', मनन मादुसकर ह्याने 'चिऊताईच्या पिला', अमेय कुलकर्णी ह्याने 'येरे येरे पावसा', ऋषिकेश काटे ह्याने 'टप टप पडती ', यशिका चौहान हिने 'नाच रे मोरा' आणि मनस्व मादुसकर ह्याने 'कावळ्याची चोच' आणि चित्रांश पांचाळ ह्याने सांग सांग भोलानाथ ह्या कवितांचे सादरीकरण केले.  शाळा बालकलाकारांची मधील मुलांच्या अनुभवाबद्दल आणि त्यांच्या सादरीकरण खरच खूप सुंदर होती.अभिनय नृत्यासोबत इतिहास, साहित्य,आणि संस्कारच्या संवर्धनाचा प्रयत्न शाळा बालकलाकारांची मध्ये करण्यात आला तो खरच कौतुकास्पद आहे असे मत बालकलाकारांच्या पालकांनी व्यक्त केले.

    *बालकलाकारांची शाळा वर्ग १ च्या यशानंतर लोकाग्रहात्सव आम्ही वर्ग २ चे आयोजन केले.मे महिन्याच्या सुट्टीत विविध समर कॅम्प असतात परंतु शाळा बालकलाकारांची मार्फत आम्ही येणाऱ्या पिढीला आपला इतिहास, आपलं साहित्य ,आपले संस्कार माहीत करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.मुलांमधील कलागुण त्यांच्यातील ऊर्जा ह्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्याचा एक प्रयत्न शाळा आम्ही शाळा बालकलाकारांची च्या दोन्ही वर्गात केला.'शुभम करोती म्हणा' हे बालनाट्य रॅप पाश्चात्य गीतांवर थिरकणाऱ्या आताच्या पिढीला आपल्या संस्कारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मुलांनी खूप आनंदाने अनुभवला.दोन्ही वर्गांमध्ये मुलांनी मनापासून प्रत्येक गोष्ट अनुभवली आणि अंगीकृत केली.आपल्या येणाऱ्या पिढीला आपले संस्कारांची ओळख करून देण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण प्रामाणिकपणे पार पदं गरजेचं आहे असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित बालकलाकार आणि पालकांना केले.* 

   सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनयकट्ट्याची बालकलाकार सई कदम हिने केले.अभिनय कट्टा ४३१ ची सुरुवात ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी रंजना दानी,स्मिता खानखोजे,विद्या खानखोजे आणि सुचेता मोडक ह्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

Web Title: 'Baljhumbad': 'Shubham Karoti Say' presented by child artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.