आॅनलाईव्दारा ५५८ वीज ग्राहकांची फसवणूक, सॉफ्टवेअर देणा-याने घातला साडेपाच लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:05 IST2017-09-29T22:05:20+5:302017-09-29T22:05:20+5:30
आॅनलाईनने भरलेले वीज बील एमएसईबीमध्ये जमा न होता त्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर देणारा रोहित खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आॅनलाईव्दारा ५५८ वीज ग्राहकांची फसवणूक, सॉफ्टवेअर देणा-याने घातला साडेपाच लाखाचा गंडा
भिवंडी : आॅनलाईनने भरलेले वीज बील एमएसईबीमध्ये जमा न होता त्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर देणारा रोहित खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्याने ५५८ वीज ग्राहकांचे पाच लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार निलेश म्हात्रे याने केली आहे.
तालुक्यातील कोनगावात वासुदेव पाटील नगरातील जानकी वेताळ अपार्टमेंटमध्ये गिरीराज मोबाईल शॉप आहे.त्या दुकानात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी निलेश गोपीनाथ म्हात्रे यांनी रोहित खोसे याच्याकडून स्मार्टवेब नावाचे आॅनलाईन सॉफ्टवेअर घेतले.त्याव्दारे ४ जुलै पासुन ५५८ वीजग्राहकांच्या ५ लाख ४६ हजार रूपयांचा आॅनलाईन वीजबीलाचा भरणा केला.मात्र भरलेले वीज बील पुन्हा नवीन वीजबिलात जोडून आले.अशा प्रकारच्या लोकांच्या तक्रारी आल्यानंतर म्हात्रे यांनी त्याची शहनिशा केली तेव्हा ही रक्कम एमएसईबीकडे जमा न होता ती रोहित खोसे याने स्वत:च्या फायद्याकरीता वापरली असे आढळून आले.या प्रकरणी निलेश म्हात्रे यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन पोलीस रोहित खोसे याचा तपास करीत आहेत.कल्याण येथे वीज बिल भरण्यासाठी जाण्यास खर्चीक असल्याने लोकांनी आॅनलाईन वीजबिल भरले होते.परंतू ही फसवणूक झाल्याने वीजबिल ग्राहक हवालदिल झाले आहे.
----------------------------------------------------------