अरे वाह! Smartwatch वर Live Cricket! Boat नं केली कमाल, इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 05:38 PM2022-03-15T17:38:07+5:302022-03-15T17:39:43+5:30
boAt नं नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे, ज्यात SpO2 सेन्सर आणि IP67 रेटिंग देण्यात आली आहे.
boAt नं भारतात boAt Wave Pro 47 नावाचं नवीन स्मार्टवॉच सादर केलं आहे. यातील 47 हा नंबर भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या साल 1947 चं प्रतीक आहे. यात SpO2 सेन्सर आणि IP67 रेटिंग असे फीचर्स मिळतात. परंतु यातील लाईव्ह क्रिकेट स्कोर फिचर जास्त चर्चेत आहे. हे वॉच ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं boAt Wave Pro 47 ची किंमत 3,199 रुपये ठेवली आहे. याची विक्री अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.
boAt Wave Pro 47 चे स्पेसिफिकेशन्स
BoAt Wave Pro 47 स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा चौकोनी टच-स्क्रीन डिस्प्ले मिळतो. हा कलर डिस्प्ले 500 निट्स च्या पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. भारतीयांसाठी यात अनेक खास वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच यात लाईव्ह क्रिकेट स्कोर फीचर देखील मिळतं. ज्याच्या मदतीनं ODI, T20, IPL इत्यादी सर्व प्रकारच्या क्रिकेट सामान्यांचा स्कोर बघता येईल. यासाठी स्मार्टवॉच फोनशी कनेक्टड असणं आवश्यक आहे.
या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 सेन्सर, पेडोमीटर, स्लीप ट्रॅकर सारखे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात. यात शरीराचं तापमान सांगण्यासाठी टेम्परेचर मॉनिटर देखील आहे. या घड्याळात अनेक स्पोर्ट्स मोड आहेत. याची IP67 वॉटर आणि डस्ट-रेजिस्टन्स रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. सिंगल चार्जमध्ये या स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवस चालते, असा दावा boAt नं केला आहे.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: शेवटचे दोन दिवस! कोणत्याही एक्सचेंज ऑफरविना 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone
- Vivo फॅन्ससाठी खुशखबर! भारतात येतोय स्वस्त 5G Smartphone; 8GB रॅम आणि मोठी बॅटरी
- थिएटरला देखील मागे टाकेल ‘हा’ 4K रिजॉल्यूशन असलेला प्रोजेक्टर; दमदार इनबिल्ट स्पिकरसह भारतात लाँच