गुढीपाडवा विशेष...! जावईहारांनी नटला सोलापूरचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 12:47 IST2018-03-13T12:47:47+5:302018-03-13T12:47:47+5:30
सोलापूरचे साखरहार मराठवाडा, कर्नाटकातही दाखल, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी

गुढीपाडवा विशेष...! जावईहारांनी नटला सोलापूरचा बाजार
सोलापूर : कौटुंबिक आनंदाचा सण म्हणून पाहिला जाणारा गुढीपाडवा रविवार, १८ मार्च रोजी साजरा होत आहे़ या पार्श्वभूमीवर मधला मारुतीसह इतर ठिकाणचा बाजार जावईहारांनी नटला आहे़ यंदाही सोलापूरचे साखर हार हे मराठवाडा आणि कर्नाटकात दाखल झाले आहेत़
दारामध्ये सकाळी गुढी उभारण्याची प्रथा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जपली गेली आहे़ साखरेच्या हाराशिवाय सण होत नाही़ यंदा हार बनविणाºया व्यावसायिकांसमोर कुशल कारागीर, मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ महाशिवरात्रीपासून शहरात शुक्रवार पेठ आणि रूपाभवानी परिसरात कारखान्यांमध्ये साखरेचे हार बनविले जात आहेत़.
या १५ दिवसात कर्नाटकमध्ये विजापूर, गुलबर्ग्यासह विविध जिल्ह्यांमध्ये सोलापूरचे साखरेचे हार विक्रीला गेले आहेत़ तसेच आता मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड, लातूरमध्ये येथील साखर हार विक्रीला गेले आहेत़ याबरोबरच साखर आणि इतर कच्च्या मालाचे दर वाढल्याने साखर हारांचे दरही काहीअंशी वाढले आहेत़ सध्या बाजारात हारांचे दर १२० रुपयांपासून आहेत़ याबरोबरच लहान मुलांना आकर्षित करणारी लहान शोभिवंत गुढी बाजारात दाखल झाली आहे़
बाजारात प्रथमच बदाम साखरेचा हार
- यंदा बाजारात जावयांसाठी आणखी एक वेगळ्याप्रकारे हार पाहायला मिळतोय़ आजपर्यंत खारीक आणि खोबºयाचा हार मानाने दिला जातोे़ यंदा प्रथमच साखरेचा आठ फुटाचा दहा इंची पदक आणि अडीच शेराचे हार बाजारात दाखल झाले आहेत़ त्यावर बंदा रुपाया, बदाम चिकटवलेले आहेत़ तसेच आणखी आगळा-वेगळा कर्नाटकी हारही पाहायला मिळतो, तो म्हणजे विविध रंगातील बत्ताशांचा साखर हाऱ अशाप्रकारे जावयांसाठी प्रथमच तीन प्रकारचे हार पाहायला मिळत आहेत़ जावयांना घालण्यासाठी बाजारात आलेल्या हारांपैकी नव्याने आलेल्या आठ फुटी हारांची किं मत ही ११०० रुपयांपर्यंत आहे़
कुशल मनुष्यबळाअभावी सोलापूर शहरात साखर हार बनवण्याचे प्रमाणही कमी आहे़ यातूनही कर्नाटक आणि मराठवाड्यात हार विक्रीला दाखल झाले आहेत़ सोलापूरने आजपर्यंत जपलेल्या वैशिष्ट्यपणामुळे राज्याबाहेर साखर हार जातोय़ यंदा जावयांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हार बनविले गेले आहेत़
- बंडू सिद्धे, विक्रेते.