महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविले

By Admin | Updated: July 24, 2014 01:17 IST2014-07-24T01:17:41+5:302014-07-24T01:17:41+5:30

सोन्याचे गंठण हिसका मारून पळवून

The gold necklace of the woman's neck fled | महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविले

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविले


सोलापूर : न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्या घरासमोर मैत्रिणीची वाट पाहत असताना अज्ञात दोन मोटरसायकलस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मीरा नरहरीराव शिंदे (वय ५८, रा. क्रीडा संकुलसमोर कुमठा नाका) यांच्या गळ्यातील १४ हजार किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून पळवून नेले. हा प्रकार बुधवारी सकाळी ६.२0 वा. न्यायाधीश मराठे यांच्या घरासमोर घडला.
मीरा शिंदे या त्यांची मैत्रीण मराठे यांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून अज्ञात दोन इसम तेथे आले. त्यातील एकजण खाली उतरून आपटे यांच्या राहण्याचा पत्ता विचारला. मीरा शिंदे यांनी कोणते आपटे असे विचारले असता पत्ता सांगण्याचा बहाणा करीत तो इसम जवळ आला त्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसका मारून काढले व मोटरसायकलवर बसून पोबारा केला. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि कोळेकर करीत आहेत.

Web Title: The gold necklace of the woman's neck fled