बोंबला! ११ फूट अजगराच्या पाठीवर बसून डझनभर बेडकांची सवारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:46 AM2019-01-02T11:46:55+5:302019-01-02T11:49:49+5:30

जोरदार पाऊस सुरु असल्यावर आपण पाहिलंय की, लोक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतात. जनावरांबाबतही असंच आहे. वेगवेगळे प्राणीही अशावेळी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत असतात.

Viral Photo Shows Cane Toads Riding On Olive Python | बोंबला! ११ फूट अजगराच्या पाठीवर बसून डझनभर बेडकांची सवारी?

बोंबला! ११ फूट अजगराच्या पाठीवर बसून डझनभर बेडकांची सवारी?

Next

जोरदार पाऊस सुरु असल्यावर आपण पाहिलंय की, लोक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतात. जनावरांबाबतही असंच आहे. वेगवेगळे प्राणीही अशावेळी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत असतात. त्यासाठी ते काय करतात याचं एक अजब उदाहरण समोर आलं आहे. एका गावात जोरदार पाऊस झाली आणि काही बेडूक सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. पण यासाठी त्यांनी मदत घेतली ती एका ११ फूट लांब अजगराची. आहे की नाही अजब बाब. 



सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यात एका लांबलचक अजगरावर काही बेडकं चिकटून बसल्याचं दिसत आहे. खरंतर सापाचं मुख्य खाद्या बेडूक हेच मानलं जातं. पण अशाप्रकारे थेट अजगराच्या पाठीवर बसूनच बेडूक प्रवास करत असल्याचं बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 





ही घटना आहे ऑस्ट्रेलियातील कुनुनउरा येथील. हा फोटो एन्ड्रू मॉक या व्यक्तीन ट्विटरवर सर्वातआधी पोस्ट केला होता. त्यांनी सांगितले की, त्याचा भाऊ पॉल मॉकने हा फोटो काढला आहे. त्यानंतर अनेकांनी हा फोटो रिशेअर करुन यावर मजेदार कॅप्शन लिहिले आहेत. 

Web Title: Viral Photo Shows Cane Toads Riding On Olive Python

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.