सिंधुदुर्ग जिल्ह्यात समर्थ युवा उपक्रमांतर्गत २१ मेपर्र्यत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग
By Admin | Updated: May 17, 2017 14:00 IST2017-05-17T14:00:26+5:302017-05-17T14:00:26+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतील उपक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समर्थ युवा उपक्रमांतर्गत २१ मेपर्र्यत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : समर्थ युवा या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ते २१ मे दरम्यान तालुकानिहाय व विषयनिहाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिनांक १९ मे रोजी ११.३0 ते १ या वेळेत वैभववाडी तहसिलदार कार्यालय येथे लेखाधिकारी पांडूरंग थोरात यांचे इतिहास विषयावर तर ४ ते ६ या वेळेत देवगड नगरपालिका येथे नायब तहसिलदार जाधव यांचे इतिहास विषयावर आणि दोडामार्ग तहसिलदार कार्यालय येथे ४ ते ६ या वेळेत दोडामार्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांचे अर्थशास्त्र विषयावर होणार आहे.
दिनांक २0 मे रोजी ९ ते १0 या वेळेत कणकवली येथील तहसिलदार कार्यालयात उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांचे इतिहास विषयावर तर ४ ते ६ या वेळेत ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जुना डी. पी. डी. सी. हॉल येथे लेखाधिकारी पांडूरंग थोरात इतिहास विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक २१ मे रोजी वेंगुर्ला येथील तहसिलदार कार्यालय येथे ११ ते १ या वेळेत तहसिलदार पवार यांचे बुध्दिमता विषयावर तर मालवण तहसिलदार कार्यालय येथे नायब तहसिलदार धनश्री भालचीम यांचे ११ ते १ या वेळेत इतिहास विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच सावंतवाडी येथील तहसिलदार कार्यालयात लेखाधिकारी पांडूरंग थोरात यांचे ११ ते १ या वेळेत इतिहास विषयावर मार्गदर्शन होणार आहे.