सावंतवाडीत पुराच्या पाण्यात महिला वाहून गेली
By Admin | Updated: July 14, 2017 23:09 IST2017-07-14T23:09:45+5:302017-07-14T23:09:45+5:30
कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (43) ही महिला कपडे धुवायला नदीवर गेली असतना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेली

सावंतवाडीत पुराच्या पाण्यात महिला वाहून गेली
ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. १४ - कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (43) ही महिला कपडे धुवायला नदीवर गेली असतना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेली. ही महिला वाहून जात असतनाच काही अंतरावर असलेल्या दोन युवकांना ती दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामस्थ व पोलीस यांनी पेडवेवाडी पासून माडखोलपर्यंत शोध मोहीम राबविली. पण ती मिळून आली नाही. शोधमोहीम राबविली पण ही महिला सापडली नाही. सायंकाळ झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे. संगीता या नेहमी याच नदीवर कपडे धुवायला जातात, पण गुरुवार पासून सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्यामुळे नदीचे पाणी वाढले होते. त्याचा अंदाज संगीता याना आला नसल्यानेच हा प्रकार घडला आहे.असे स्थानिक ग्रामस्थानी सांगितले.