अवघा सिंधुदुर्ग फुटबॉलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 12:55 IST2017-09-16T12:52:26+5:302017-09-16T12:55:17+5:30
सिधुदुर्ग येथील डॉन बास्को शाळेत महाराष्ट्र मिशन -1 मिलियन फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हापरिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर, जिल्हास्काऊड गाईडच्या संघटक अंजली माहुरे, शिक्षकवृंद व विद्यार्थी – विद्यार्थींनी तसेच फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.

अवघा सिंधुदुर्ग फुटबॉलमय
सिंधुदुर्गनगरी, दि. 16: सिधुदुर्ग येथील डॉन बास्को शाळेत महाराष्ट्र मिशन -1 मिलियन फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हापरिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर, जिल्हास्काऊड गाईडच्या संघटक अंजली माहुरे, शिक्षकवृंद व विद्यार्थी – विद्यार्थींनी तसेच फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर म्हणाले की, माहे ऑक्टोबर महिन्यात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळले.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे काही समाने महाराष्ट्रात होणारआहेत. वातावरणनिर्मिती व राज्यातील खेळाडूंत फुटबॉलची आवड निर्माण व्हावी. या अनुषंगाने जिल्हा क्रीडा कार्यालयतर्फे प्रत्येक तालुक्यातीलगट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत 247 शाळांना 812 फुटबॉल वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 247 शाळांतील विविध मुला मुलीच्या गटामध्ये फुटबॉल खेळांचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
फुटबॉल वर्ल्डकप 2017 अंतर्गत फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आज सिंधुदुर्ग येथील जिल्हा कारागृह येथे कारागृह पोलीस कर्मचारीविरुध्द कैदी असा फुटबॉल सामना आयेाजित करण्यात आला. यावेळी प्र. जिल्हा कारागृह अधिक्षक एस. पी. काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरणबोरडवेकर, महिला व बालविकासचे जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी चंद्रशेखर तेली, जिल्हा स्काऊड गाईड संघटक अंजली माहुरे व कारागृहातीलअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.