सातारा : लोकमतचा आदर करत लाडका पक्षी साताऱ्यांतच, शांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:06 IST2018-02-09T13:00:08+5:302018-02-09T13:06:22+5:30
सातारा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोलिस परेड मैदानात हा पक्षी बसविण्यात येणार आहे. साताऱ्यात कोठेही बसवा, मात्र शहराबाहेर हलवू नका, अशी स्पष्ट भूमिका लोकमतमधून मांडण्यात आली होती.

सातारा : लोकमतचा आदर करत लाडका पक्षी साताऱ्यांतच, शांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार
सातारा : जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोलिस परेड मैदानात हा पक्षी बसविण्यात येणार आहे. साताऱ्यात कोठेही बसवा, मात्र शहराबाहेर हलवू नका, अशी स्पष्ट भूमिका लोकमतमधून मांडण्यात आली होती.
शतकोत्तर पोलिस मुख्यालयासमोरील असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा १७ वर्षांपूर्वी बसविला होता. ऐतिहासिक इमारतीसमोर असलेला हा पुतळा जाता-येता प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता. या पुतळ्याशी बहुतांश सातारकरांचं भावनिक नातं जोडलं गेलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर हा पुतळा कोल्हापूरला हलविण्याचा घाट प्रशासनाने घातला.
दरम्यान, गुरुवारी रात्री शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडण्याची धक्कादायक मोहीम आकस्मिकपणे सुरू केली गेली.
पुतळा उखडण्यात येत असल्याचे पाहून शेकडो सातारकांनी या विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. गुरुवारी रात्री उशिरा सुशांत मोरे, रवींद्र कांबळे आणि प्रशांत जगताप या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत काम थांबवले. पुतळा हलवायचाच असले तर साताऱ्यांतच कुठेही बसवा, मात्र केवळ एका अधिकाऱ्यांच्या इच्छेखातर कोल्हापुरात न्यायची गरज आहे का? अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.