दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 04:29 PM2017-11-24T16:29:15+5:302017-11-24T16:30:48+5:30

अधिवास नष्ट केल्याचा परिणाम: तलावात मानवी हस्तक्षेप, वावर कारणीभूत

no migrations in this winter to Meherun Lake form the indian and foreign birds | दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

Next
ठळक मुद्दे ९५ प्रकारचे पक्षी यायचे पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमानवी हस्तक्षेप वाढला

जळगाव: मेहरूण तलावाच्या खोलीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेले खोदकाम व भराव तसेच तलावात वाढलेला मानवी वावर यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून येणाºया देशी व विदेशी पक्ष्यांनी तलावाकडे यंदा पाठ फिरविली आहे. परिसरातही केवळ स्थानिक पॉण्ड हेरॉन, पाणकावळा आदी ४-५ प्रकारचेच पक्षी तेही अगदी तुरळकपणे दिसून येत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रा.राजेंद्र गाडगीळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
मेहरूण तलाव परिसरात इतर पाणवठे नसल्याने व जे आहेत ते प्रदूषित असल्याने शिरसोली रस्त्यावरील छोट्या तलावाकाठी मोरश्ेराटी, ब्राह्मीबदक आदी चारपाच  प्रकारचे पक्षी आलेले आहेत. मात्र त्यांची संख्याही फार नाही.
९५ प्रकारचे पक्षी यायचे
पूर्वी मेहरूण तलाव हे पक्ष्याचा मोठा अधिवास क्षेत्र होते. हिवाळा सुरू झाला की पूर्व युरोप, सैबेरिया, आफ्रिका आदी देशांमधून तसेच हिमालयातूनही सुमारे ९५ प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येने स्थलांतर करून यायचे. त्यात ३०-४० प्रकारचे स्थानिक पक्षीही असायचे. मोठमोठ्या थव्याने हे पक्षी मेहरूण तलावाच्या परिसरात काही दिवस आश्रय घेत. तलावातील पाणवनस्पतींवर बसून पाण्यातील किडे, मासे यांची शिकार करीत.
पक्ष्यांचा अधिवास केला नष्ट
मेहरूण तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलावावर स्थलांतर करून येणाºया पक्ष्यांच्या संख्येत घट होत होती. हीबाब निदर्शनास आणून देऊनही मनपाने त्याकडे दूर्लक्ष करीत तलावात मानवी हस्तक्षेप सुरूच ठेवल्यामुळे  पक्ष्याच्या अधिवास नष्ट झाला आहे. पक्ष्यांना बसण्यासाठी पाण्यात असलेले उंचवटे नष्ट झाले आहेत. तसेच पक्ष्यांना बसण्यासाठी अंडी घालण्यासाठी आवश्यक झाडोरा (पाण्यातील झुडपे) नष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदा मेहरूण तलाव परिसरात स्थलांतर करून पक्षी आलेच नाहीत.
मानवी हस्तक्षेप वाढला
 तलावाच्या हद्दीत भराव घालून रस्ता करण्यात आला आहे. आता हा रस्ता आणखी रूंद करण्याचा घाट घातला जात आहे. तलावाच्या लगतच्या रहिवाशांनी अनेक वर्षांपासून सांडपाणी तलावातच सोडले आहे. ही बाब निदर्शनास आणूनही मनपाकडून तलावात येणारे सांडपाणी बंद झालेले नाही. गाडगीळ यांनी सांगितले की, काही लोकांनी तर लपून-छपून सांडपाणी तलावात सोडले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नाही.

 

Web Title: no migrations in this winter to Meherun Lake form the indian and foreign birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.