कऱ्हाड तालुक्यातील घोगावला येथील दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 14:37 IST2017-08-23T14:05:52+5:302017-08-23T14:37:07+5:30
घोगाव ता. कºहाड येथे मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी एकास बेदम मारहाण करत दोन घरे फोडली. यावेळी सुमारे चार तोळे सोने व रोख वीस हजार चोरून नेले. राजेंद्र बाळासाहेब मदने असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे.

कऱ्हाड तालुक्यातील घोगावला येथील दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जखमी
उंडाळे : घोगाव ता. कºहाड येथे मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी एकास बेदम मारहाण करत दोन घरे फोडली. यावेळी सुमारे चार तोळे सोने व रोख वीस हजार चोरून नेले. राजेंद्र बाळासाहेब मदने असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे.
दरम्यान, मारहाण झालेल्या मदने यांनी सांगितले की, घडलेली घटना पोलिसांना सांगण्यासाठी रात्री ठाण्यात गेलो तेव्हा तिथे पोलिस नव्हते. त्यानंतर याविषयीची माहिती त्यांना फोनवरूनही दिली. मात्र, सकाळपर्यंतही पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र, याबाबत कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिस कर्मचाºयांना घटनास्थळी पाठविले असून घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.