सांगलीत सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन, तापमानातील चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:54 IST2018-03-05T13:54:34+5:302018-03-05T13:54:34+5:30

सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला.

Sangli, in the morning, fog in the morning, winters in the afternoon, fluctuations in temperature | सांगलीत सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन, तापमानातील चढ-उतार कायम

सांगलीत सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन, तापमानातील चढ-उतार कायम

ठळक मुद्देसकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन सांगलीतील स्थिती , तापमानातील चढ-उतार कायम

सांगली : जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला.

गेली वर्षभर वातावरणातील लहरीपणाचा अनुभव सांगली जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. अचानक होणारा वातावरणातील बदल लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू लागला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३४ ते ३७ अंशाच्या घरात राहिले आहे. किमान तापमानातही वाढ होताना दिसते.

अशातच सोमवारी पहाटे दाट धुके पडले होते. धुक्यांनी शहराला चार तास कवेत घेतले होते. सकाळी नऊनंतर धुके कमी झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या तापमानात हळुहळू वाढ होत दुपारी कडक ऊन पडले.

दुपारी १ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशापर्यंत गेले होते. किमान तापमान १८ अंशाच्या घरात होते. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच ते सहा दिवसात तापमानात वाढच होणार आहे.

जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावर जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sangli, in the morning, fog in the morning, winters in the afternoon, fluctuations in temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.