पक्ष मजबुतीसाठी बूथ रचना महत्त्वाची : पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:15 IST2017-12-08T00:14:05+5:302017-12-08T00:15:52+5:30
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत.

पक्ष मजबुतीसाठी बूथ रचना महत्त्वाची : पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत. पक्ष मजबुतीसाठी बूथरचना महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत पक्ष टिकविण्याचे काम विक्रम पाटील यांनी केले आहे. यापुढेसुध्दा पक्षाची ताकद वाढविण्याचे इंद्रधनुष्य त्यांनी पेलावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
येथे वाळवा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. देशमुख म्हणाले, देशात व राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वच योजना चांगल्याप्रकारे राबविल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हतबल झालेला आहे. वाळवा तालुक्यात नवीन लोक पक्षात घेऊन पक्ष मजबूत करावा.
आमदार नाईक म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे भूमिपूजन केले. ही योजना पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये म्हणून पाईपद्वारे ही योजना पूर्ण होईल. रेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात निघेल.
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात परिवर्तन घडवू. साखराळे गावातील ज्या बूथवर जयंत पाटील मतदान करतात, तेथे ग्रामपंचायत निवडणुकीत जादा मतदान घेतले आहे. येडेमच्छिंद्र येथे आमचा सरपंच झालेला आहे.
जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आपण आष्टा तालुक्याची मागणी केली आहे. ती लवकरच मार्गी लागेल. आष्टा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन करावा, यासाठी सामुदायिक प्रयत्न करू. राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सयाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी भगवानराव साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, गजानन फल्ले, रणधीर नाईक, स्वरुपराव पाटील, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, प्रसाद पाटील, समीर आगा, संदीपराज पवार, खुदा खिलारे, बजरंग माने, भानुदास पाटोळे, बबनराव शिंदे, युवराज खामकर, नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
आता वन बूथ-टेन बूथ भाजप नेते विक्रम पाटील म्हणालेकी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अशोकदादा पाटील यांना ३१ हजार ५०० मते मिळाली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही निर्माण केले. या कार्यकर्त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक आमिषे दाखवली. परंतु स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्यापासून दूर गेले नाहीत. आतावन बूथ-टेन बूथ ही योजना पूर्ण करु.