रत्नागिरी : म्हाडा घराच्या किमती कमी करणार : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:59 IST2018-09-11T16:56:18+5:302018-09-11T16:59:29+5:30
शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीवार्दामुळे मला आज कॅबिनेट दर्जाचे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले आहे, हा माझा सन्मान आहे.

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
रत्नागिरी : शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीवार्दामुळे मला आज कॅबिनेट दर्जाचे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले आहे, हा माझा सन्मान आहे.
म्हाडाच्या घराच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यासंदर्भात म्हाडाशी संबंधित सर्व विभागाची बैठक आयोजित करून म्हाडाच्या घराचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिले.
पुढे सामंत म्हणाले की, मी कोकणातला असल्याने कोकणासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. श्रीमंतांपासून गरिबापर्यंत ज्याचं घर नाही, अशांना घर देण्याचे काम म्हाडाचे आहे. मातोश्रींच्या डोळ्यासमोर काम करायचे आहे, त्यामुळे निश्चितच मी चांगले काम करेन, असे उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेना नेते आणि बाधंकाम मंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय कदम, मुंबईचे महापौर प्रा. विनायक महाडेश्वर, आमदार अंनिस परब, प्रसाद लाड उपस्थित होते.