राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढविणार : निरंजन डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:04 IST2017-10-31T15:55:44+5:302017-10-31T16:04:35+5:30
आपण शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे आहे. आपण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी लोकमतला दिली.

राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढविणार : निरंजन डावखरे
चिपळूण : आपण शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे आहे. आपण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी लोकमतला दिली.
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेखर निकम, कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली.
यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागणार असून या पक्षातर्फेच निवडणूक लढविणार आहे. विरोधक दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत. या अफवावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये असे आमदार डावखरे यांनी सांगितले.