मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन मोबदल्यासाठी मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 17:11 IST2017-10-28T17:07:52+5:302017-10-28T17:11:00+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी शशिकांत हरेकर (रा. कामथे खुर्द) यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला.

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन मोबदल्यासाठी मुंडन
ठळक मुद्देमोबदला न मिळाल्याने मुंडन उपविभागीय कार्यालयासमोर शासनाचा निषेध
चिपळूण , दि. २८ : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी शशिकांत हरेकर (रा. कामथे खुर्द) यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला.
कामथे खुर्द सर्व्हे क्र. ६२२ या मिळकतीतून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने त्याच्या मोबदल्यासंदर्भात दि. २७ मार्च रोजी हरेकर यांना नोटीस देऊन कळविण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रही त्यांनी सादर केली. मात्र, आजतागायत मोबदला न मिळाल्याने त्यांनी दुपारी मुंडन करून निषेध नोंदवला.