जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:12 IST2018-02-23T16:09:33+5:302018-02-23T16:12:45+5:30
पाचघर (ता. जुन्नर) येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पाचघर (ता. जुन्नर) येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. मोहंमद अकबर हबीब शेख (वय ३२,रा. ब्राह्मणवाडा, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास घडली. प्राथमिक शिक्षक सखाराम काशिनाथ वाळेकर (वय ३५ रा. ओतूर) यांनी या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना दिली.
वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद शेख हे त्यांच्या कारने ब्राह्मणवाडा येथून ओतूर येथे दररोज येत असत. आम्ही दोघेही सोबत पाचघरला शाळेत जात होतो. २२ तारखेला संध्याकाळी मात्र, वाळेकर यांना शाळेचा दरवाजा आतून बंद असल्याचा फोन आला. त्यानंतर ते दुसºया गाडीने पाचघरला पोहचले. त्यांनी खिडकीतून आत पाहिले. तेव्हा छताला असणाऱ्या गजाला शेख गुरूजींनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसले. ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर शेख यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पाठविला. या घटनेची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.