येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:10 IST2018-04-19T04:10:44+5:302018-04-19T04:10:44+5:30

मावशी व बहिणीसह तो येरवड्यात राहत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी आला. कामानिमित्त बाहेर जातो म्हणून तो पुन्हा बाहेर गेला.

Yerawada youth stoned to death | येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून


विमाननगर : येरवडा येथील कॉमर झोनच्या समोरील मनोरुग्णालयाच्या मैदानावर बुधवारी पहाटे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
निखिल श्रीकांत कडाळे (वय २५, रा़ पंचशीलनगर, येरवडा) असे या तरुणाचे नाव आहे़ हा प्रकार बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी त्याचे शेजारी राजेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की कॉमर झोन आयटी पार्कसमोरील मनोरुग्णालयाच्या मैदानावर एका तरुणाचा खून झाल्याची माहिती सकाळी ८ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांनी मिळाली़ एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता़ पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता पंचशीलनगर येथे राहणारा निखिल कडाळे याचा तो मृतदेह असल्याची माहिती मिळाली़
मावशी व बहिणीसह तो येरवड्यात राहत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी आला. कामानिमित्त बाहेर जातो म्हणून तो पुन्हा बाहेर गेला. सकाळी घराजवळील मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांना मिळाली. उपायुक्त दीपक साकोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली़

Web Title: Yerawada youth stoned to death