विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:31 IST2018-02-22T15:28:32+5:302018-02-22T15:31:00+5:30
माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
महेश नानासाहेब कातोरे (वय ३०, रा़ शिवलीला सोसायटी, फुरसुंगी) असे पतीचे नाव आहे़ याप्रकरणी भाऊसाहेब तुरकणे (वय ५८, रा़ साईनगर, ता़ राहता, जि़ अहमदनगर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की सायली महेश कातोरे (वय २६) हिचा विवाह महेश कातोरे यांच्याबरोबर झाला होता़ सासरी नांदत असताना महेश व इतरांनी १७ एप्रिल २०१६ पासून माहेराहून फ्लॅट घेण्यासाटी २० लाख रुपये आण व मोटारसायकल घेण्यासाठी ७५ हजार रुपये आण, अशी मागणी करुन तिला वारंवार टोचून बोलत होते़ सासरी होणाऱ्या या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सायली कातोरे हिने १४ फेब्रुवारी रोजी घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शेंडगे अधिक तपास करीत आहेत.