करसंकलन विभागात टोकन पद्धत
By Admin | Updated: April 29, 2017 04:16 IST2017-04-29T04:16:34+5:302017-04-29T04:16:34+5:30
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या करसंकलन विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून, नुकतेच ते नागरिकांसाठी

करसंकलन विभागात टोकन पद्धत
वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या करसंकलन विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून, नुकतेच ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले. अत्याधुनिक केंद्रामुळे नागरिकांची सोय होत असून येथील नव्याने टोकन पद्धत सुरू केल्याने आता नागरिकांना कर भरण्यासाठी रांगेत ताटकळत थांबावे लागत नसल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
मागील काही महिन्यांपासून या केंद्राचे अद्ययावत करण्याचे काम सुरू होते. नागरिकांना या केंद्रात बसण्यासाठी नवी आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सोयी करण्यात आल्या आहेत. टोकन व्यवस्थेमुळे नागरिकांचा वेळदेखील वाचत आहे.
अधिकारी व कर्मचारी यांनादेखील नवीन फर्निचर, पीओपीचे सीलिंग, आधुनिक प्रकाशव्यवस्था मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढला आहे, असे मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)