‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी शिरवलीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST2018-08-26T00:38:10+5:302018-08-26T00:38:24+5:30
येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’ या कार्यक्रमांतर्गत केंद्र स्तरावरून स्वच्छ सर्वेक्षण अभियान पाहणी कार्यक्रम घेण्यात आला होता.

‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी शिरवलीची निवड
सांगवी : शिरवली (ता. बारामती) येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’ या कार्यक्रमांतर्गत केंद्र स्तरावरून स्वच्छ सर्वेक्षण अभियान पाहणी कार्यक्रम घेण्यात आला होता. स्वच्छता सर्वेक्षणात केंद्र स्तरातून बारामती तालुक्यातून शिरवली गावाची केंद्र स्तरावरून सोडत पद्धतीने स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी निवड करण्यात आली होती.
आयएमआरबी संस्थेच्या मीना सस्ते, स्वच्छ भारत अभियान जिल्हा समन्वयक विक्रम शिंदे, संतोष अवघडे, बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे, यांनी स्वच्छता सर्वेक्षण पाहणी केली. १ आॅगस्टपासून विविध स्वच्छतेसंबंधी कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवून दिले होते. त्यानुसार प्रत्येक गावात १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्टपर्यंत ज्या काही गावांत स्वच्छतेसंबंधी काही त्रुटी असतील त्या पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सुचविण्यात आले होते. स्वच्छतेसंबंधी जागोजागी फलक लावून, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र, मंदिरे या ठिकाणी प्रभात फेरी काढून घेण्यात आली. सर्व ठिकाणी शौचालयाचे दुरुस्ती बांधकाम तसेच त्याची व्यवस्था चांगली करण्यात आलेली होती. तसेच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय पद्धतीने प्रकिया, ओला व सुका कचºयाचे योग्य नियोजन, ग्रामस्थ सार्वजनिक शौचालयांचा वापर व व्यवस्थापन स्वत: करतात, तसेच शाळेतील भिंतीवर बोलक्या चित्रांद्वारे स्वच्छतेचे संदेश दिले होते. सरपंच रेश्मा पोंदकुले व ग्रामसेवक सुजाता संदीप आगवणे व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
या वेळी विस्तार अधिकारी वाघ, उपसरपंच राजेंद्र बांदल, सदस्य अविनाश राऊत, अनिता पोंदकुले, सविता परदेशी, रूपाली कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मदने, पोलीस पाटील नितीन घनवट, ग्रामीण स्वछता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष मेघश्याम पोंदकुले, अजित गुरव, बापूराव ननवरे, सुनील जगताप, शिवाजी पोंदकुले यांच्यासह ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.