गणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणा; आध्यात्मिक गुरूंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:22 IST2019-01-19T05:19:36+5:302019-01-19T11:22:42+5:30
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही, अशी खंत व्यक्त करत गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली.

गणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणा; आध्यात्मिक गुरूंची मागणी
पुणे : देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही, अशी खंत व्यक्त करत गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. गणपती धर्मनिरपेक्ष आहे, असा दावाही त्यांनी केला.
एमआयटी विश्व शांती विद्यापीठामध्ये आयोजित भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ओझा बोलत होते. ते म्हणाले, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. मग एकच देव कसा असेल, असे काही जण म्हणतील. पण मी जो देव म्हणतोय तो धर्मनिरपेक्षच आहे.
लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या देशामध्ये गणपती हाच राष्ट्रदेव होऊ शकेल. गणपतीची लांब सोंड, मोठे कान, मोठे पोट हे सगळे प्रतीकात्मकपणे आपल्या नेत्यांमध्येही हवे. गणपतीप्रमाणे मोठे कान हवेत. म्हणजे त्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे.