पुण्याच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे
By Admin | Updated: June 15, 2017 01:43 IST2017-06-15T01:43:50+5:302017-06-15T01:43:50+5:30
शहराच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे

पुण्याच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली म्हणून अर्ज मागे घेत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. धेंडे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. कांबळे यांचे विचार तसेच त्यांनी या पदावरून काम करताना व्यक्त केलेली परगावातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे वसतिगृह सुरू करण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.