दारू पिण्यास विरोध; पत्नीवर केला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 02:08 IST2018-10-14T02:08:33+5:302018-10-14T02:08:53+5:30

पुणे : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी ...

Oppose to drink alcohol; Firing on wife | दारू पिण्यास विरोध; पत्नीवर केला गोळीबार

दारू पिण्यास विरोध; पत्नीवर केला गोळीबार

पुणे : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे़ बालाजी रंगनाथ चाथे (वय ४६, रा़ ताडीवाला रोड) असे त्याचे नाव आहे़ घटनेत त्यांच्या पत्नी कडूबाई जखमी झाल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाथे हा बीएसएफमध्ये जवान म्हणून कामाला होता़ सध्या तो निवृत्त झाला असून एका ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम पहात होता़ त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे़ पत्नी व मुलगा त्यांना दारु पिण्यापासून परावृत्त करत होते़ शुक्रवारी दुपारी घरी आल्यावर त्याने दारु पिण्यास सुरुवात केली़ पत्नी व मुलगा योगेश यांनी त्यांना मज्जाव केला. तेव्हा नशेतच बालाजी याने कमरेचे पिस्तुल काढून पत्नीच्या दिशेने गोळी झाडली़ गोळी चाटून नेल्याने कडुबाई जखमी झाल्या़ यानंतर बालाजी पळून गेला़ मुलगा योगेश चाथे याने फिर्याद दिली़

Web Title: Oppose to drink alcohol; Firing on wife