जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:13 IST2018-05-17T15:13:43+5:302018-05-17T15:13:43+5:30

जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. 

caught taking a bribe of 10 thousand for the land measuring letter | जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

ठळक मुद्दे तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बारामती येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सापळा

पुणे : जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार अमिन जहांगीर तडवी (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. 
तक्रारदार यांनी त्यांचे जमिनीची शासकीय मोजणी करुन देण्यासाठी बारामतीच्या भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़. त्यावरुन तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली होती़. तक्रारदार यांना जमिनीची मोजणीचे क प्रत देण्यासाठी बारामती येथील कार्यालयातील निमतानदार अमिन तडवी यांना १० हजार रुपयांची लाच मागितली होती़. 
तक्रारदार यांनी लाचलुपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला़. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बारामती येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सापळा रचण्यात आला़. तक्रारदार यांच्याकडून गुरुवारी सकाळी तेथील पार्किगमध्ये १० हजार रुपये स्वीकारताना तडवी यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. त्यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे़. 
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़. 

Web Title: caught taking a bribe of 10 thousand for the land measuring letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.