कामशेत बोगद्यात कारची बसला धडक; ३ ठार, २ जखमी
By Admin | Updated: May 7, 2017 17:15 IST2017-05-07T17:15:46+5:302017-05-07T17:15:46+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार समोर जाणार्या बसला मागून जोरात धडकून भीषण अपघात झाला

कामशेत बोगद्यात कारची बसला धडक; ३ ठार, २ जखमी
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 7 - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार समोर जाणार्या बसला मागून जोरात धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी निता व्होल्वो बस ही कामशेत बोगद्यातून मुंबईकडे जाताना अचानक गाडीच्या मागील बाजूने धूर येऊन ऑइल गळू लागले, त्यावेळी बोगद्यातील लाईट गेली आणि मागून भरधाव वेगात आलेली कारही बसला मागून धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये कार चालकासह दोन जण व एक महिला मृत्युमुखी पडली, तर एका लहान मुलासह दोन जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक आणि आयआरबीच्या पथकाने अपघातग्रस्त कारमधून मृत आणि जखमी यांना बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत ऑइल गळाल्याल्या ठिकाणी माती टाकत दोन लेनवरून वाहतूक सुरू केली.