किदाम्बी श्रीकांतनं पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 13:25 IST2017-10-30T11:54:45+5:302017-10-30T13:25:23+5:30

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतनं फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात जपानच्या केंटा निशिमोटोवर 21-14, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात करत जेतेपद पटकावलं
श्रीकांतचे या वर्षातील हे चौथे तर एकूण सहावे विजेतेपद आहे
फ्रेंच ओपन बॅडमिंटन जिंकणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे
श्रीकांतनं फक्त 34 मिनिटांत निशिमोटाला पराभूत केलं