प्रिन्स हॅरी प्रेयसी मेगन मर्केलसोबत 2018 मध्ये अडकणार विवाह बंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:14 IST2017-11-28T15:12:19+5:302017-11-28T15:14:13+5:30

ब्रिटेनचे प्रिन्स हॅरी व अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्केल 2018मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
सोमवारी (27 नोव्हेंबर) या दोघांच्या लग्नाबाबतची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली.
प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल या दोघांच्या लग्नाची तारिख अद्यापपर्यंत निश्चित करण्यात आलेली नाही.
दोघांनीही नोव्हेंबर महिन्यातच साखरपुडा केला होता.