तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल
By Admin | Updated: March 24, 2016 17:12 IST2016-03-24T13:13:26+5:302016-03-24T17:12:47+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल भिरकावण्यात आली आहे. हैदराबाद विश्वविद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला

तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल
ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद ,दि. २४ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल भिरकावण्यात आली आहे. हैदराबाद विश्वविद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. कार्यक्रम सुरु असताना एका विद्यार्थ्यांना भारत माता की जय अशा घोषणा देत कन्हैय्या कुमारच्या दिशेने चप्प्ल फेकली. पोलिसांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे,
कन्हैय्या कुमार सध्या हैदराबाद येथे असून बुधवारी हैदराबाद विश्वविद्यापीठाला भेट देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला गेटवरच रोखण्यात आले होते. रोहीत वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैय्याने विद्यार्थ्यांची भेट संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना हा प्रकार घडला. देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी असून तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षही आहे.
Ruckus at #KanhaiyaKumar 's program in Hyderabad pic.twitter.com/yHT0QdbzjH
— ANI (@ANI_news) March 24, 2016