कारचा दरवाजा बंद करण्यास नकार दिल्याने पत्नीला दिला घटस्फोट
By Admin | Updated: September 25, 2014 15:07 IST2014-09-25T15:00:30+5:302014-09-25T15:07:41+5:30
कारचा दरवाजा बंद करण्यास नकार दिल्यामुळे एका इसमाने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिल्याची अजब घटना समोर आली आहे.

कारचा दरवाजा बंद करण्यास नकार दिल्याने पत्नीला दिला घटस्फोट
>ऑनलाइन टीम
रियाध, दि. २५ - कारचा दरवाजा बंद करण्यास नकार दिल्यामुळे सौदीतील एका इसमाने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिल्याची अजब घटना समोर आली आहे. मीडियाने दिलेल्य वृत्तानुसार, संबंधित इसम पत्नी व मुलांसह फिरायला बाहेर गेला होता. घरी परत आल्यावर त्याची पत्नी कारमधून उतरली आणि मुलांना घेऊन घरात गेली. मात्र त्या इसमाने तिला हाक मारून बाहेर बोलावले आणि कारचा दरवाजा बंद करण्यास फर्मावले. मात्र त्याच्या पत्नीने त्याचे ऐकण्यास नकार देत कारच्या जवळ असल्याने त्यानेच दार बंद करावे असे सुचवले.
पत्नीने आपले म्हणणे ऐकण्यास नकार दिलेल्या त्या इसमाने पत्नीशी कोणतेही संबंध नसल्याचे जाहीर केले. 'जर कारचा दरवाजा बंद केला नाही तर तुला परत माझ्या घरात पाऊल टाकता येणार नाही' अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर त्याची बायको सरळ तिच्या वडिलांच्या घरी निघून गेली.
त्यांच्या नातेवाईकांनी दोघांनाही समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने काहीही ऐकण्यास नकार देत अशा 'बेजबाबदार' माणसासोबत राहण्यात आपल्याला काडीचाही रस नसल्याचे स्पष्ट केले.