VIDEO : ...अन् थोडक्यात बचावले लालू प्रसाद यादव

By Admin | Updated: March 25, 2017 15:58 IST2017-03-25T15:47:46+5:302017-03-25T15:58:30+5:30

पाटणा येथील राजदच्या कार्यक्रमात स्टेजवर लोकांची गर्दी वाढल्याने स्टेज कोसळला. या घटनेत लालू प्रसाद यादव यांना दुखापत झाली आहे.

VIDEO: Lalu Prasad Yadav survived in brief | VIDEO : ...अन् थोडक्यात बचावले लालू प्रसाद यादव

VIDEO : ...अन् थोडक्यात बचावले लालू प्रसाद यादव

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. 25 - बिहारची राजधानी पाटणा येथे दिघा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या यज्ञ कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मंच कोसळला. या घटनेत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव जखमी झाले आहेत. शुक्रवारी ही घटना घडली आहे. घटनेनंतर त्यांना इंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लालू यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे. लालू यांनी सांगितले की, कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील लोकांची संख्या वाढल्याने मंच कोसळला. या कार्यक्रमासाठी लालूंसोबत त्यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव आणि आरोग्य मंत्री तेजप्रताप, राज्यसभेच्या खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यादेखील उपस्थित होत्या. ही मंडळीदेखील मंचावर बसलेले होते. दरम्यान, या घटनेनंतर लालू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंबरेला दुखापत झाल्याने एक्स रे काढण्यात आला आहे. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: VIDEO: Lalu Prasad Yadav survived in brief