उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर; समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 07:00 PM2024-02-07T19:00:42+5:302024-02-07T19:03:42+5:30

उत्तराखंडमध्ये विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

Uttarakhand Assembly passes UCC Bill It will be the first state to enact a Uniform Civil Code | उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर; समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरणार

उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर; समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरणार

उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. UCC विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यासह उत्तराखंड हा समान कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते आता सत्यात उतरणार आहे. आपण इतिहास घडवणार आहोत. देशातील इतर राज्यांनीही त्याच दिशेने वाटचाल करायला हवी, असंही धामी म्हणाले. 

मालमत्ता वाटणीबाबत समान नागरी कायद्यात कशी तरतूद? जाणून घ्या सविस्तर

UCC विधेयक मंजूर झाल्यानंतर ते विधेयक आता राज्यपालांकडे पाठवले जाईल. राज्यपालांची स्वाक्षरी होताच याचे कायद्यात रुपांतर होईल. यामुळे राज्यातील सर्व जनतेला समान कायदे लागू होतील. त्याच्या तरतुदी अनुसूचित जमाती (ST) लोकांना लागू होणार नाहीत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने समान नागरी संहितेचे आश्वासन दिले होते. धामी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अडीच लाखांहून अधिक सूचना मिळाल्यानंतर यूसीसीचा मसुदा तयार केला होता. उत्तराखंड हे पहिले राज्य असेल जिथे समान नागरी संहिता कायदा लागू होणार आहे. याआधी गोव्यात समान नागरी संहिता लागू होती, पण पोर्तुगालच्या राजवटीपासून ते तेथे लागू होते.

मालमत्ता वाटणीबाबत समान नागरी कायद्यात कशी तरतूद? 

या विधेयकामध्ये 'बायोलॉजिकल राइट्स' कल्पना आणण्यात आले आहेत.  युसीसीमध्ये असामान्य विवाहातून जन्मलेली वैध मुले तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेली मुले म्हणून ओळखते. याशिवाय या विधेयकात गर्भाला वारसा हक्कही देण्यात आला आहे. याशिवाय ज्या मुलांची नजर आपल्या पालकांच्या मालमत्तेवर असते त्यांच्यासाठीही या विधेयकात काही तरदुदी देण्यात आल्या आहेत.

ज्या व्यक्तीच्या मालमत्तेची वाटणी करायची आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी जन्मलेल्या किंवा गर्भात असलेल्या वारसांमधील उत्तराधिकाराच्या हेतूंसाठी UCC विधेयक कोणताही फरक करत नाही. आतापासून उत्तराधिकारी मानले जाईल.

उत्तराखंडमधील समान नागरी विधेयकात संपत्ती विभाजनाची प्रक्रीया तपशीलावर दिली आहे. या विधेयकात मुलगी आणि मुलाला समान संपत्ती वाटणीचे अधिकार दिले आहेत. समान नागरी संहितेत, बेकायदेशीर संबंधातून जन्माला आलेली मुले आणि मालमत्तेच्या हक्काबाबत सामान्य मुले यांच्यात कोणताही भेद केला नाही. या विधेयकात अशा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बालकांनाही जैविक मूल मानले आहे, त्यांना मालमत्तेचे वारस मानले जाते. उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड अंतर्गत, दत्तक, सरोगसी किंवा इतर वैद्यकीय तंत्राद्वारे जन्मलेल्या मुलांमध्ये कोणताही भेद नाही. 

Web Title: Uttarakhand Assembly passes UCC Bill It will be the first state to enact a Uniform Civil Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.