सव्वा तासात दोन चेन स्नॅचिंग

By Admin | Updated: August 27, 2015 00:20 IST2015-08-27T00:20:32+5:302015-08-27T00:20:32+5:30

सव्वा तासात दोन चेन स्नॅचिंग

Two chain snatch in the first hour | सव्वा तासात दोन चेन स्नॅचिंग

सव्वा तासात दोन चेन स्नॅचिंग

्वा तासात दोन चेन स्नॅचिंग
नागपूर : बुधवारी सकाळी सव्वा तासात चेन स्नॅचर्सने दोन महिलांना लुटले. इंदोरा येथील नलिनी ओमप्रकाश चिमणकर या पतीसोबत बाईकने बुधवारी सकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान एलआयसी चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जात होत्या. दरम्यान, नलिनी यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. त्याचप्रकारे भामटी येथील राधिका श्याम गावपंडे या ॲक्टिव्हा गाडीने सकाळी ८.३० वाजता लक्ष्मीनगर चौकाकडून जात असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले.

मुलीची छेडखानी
नागपूर : १० वर्षीय मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली. पंकज तिरपुडे (३५) रा. इंदोरा चौक असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचे डोके फोडले
नागपूर : जुन्या वादात एका तरुणाचे डोके फोडण्यात आले. टेकडी लाईन येेथील २१ वर्षीय रोहिल राठोड मंगळवारी दुपारी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी टेकडी लाईन येथील एका किराणा दुकानात गेला होता. तिथे आरोपी पिंटू सावडिया आणि लोकेश सावडिया यांनी दगडाने डोक्यावर वार करून रोहिलला जखमी केले. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two chain snatch in the first hour