आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस
By Admin | Updated: October 5, 2016 12:26 IST2016-10-05T12:15:38+5:302016-10-05T12:26:21+5:30
नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.

आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही तीन वेळा शत्रू प्रदेशात सर्जिकल स्ट्राईक्स केल्या पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कधीही त्याचा गवगवा केला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी तीनवेळा सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
१ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ या तारखांना आपल्या सैन्य दलाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सांगितले. नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्र सरकारच्या परवानगीमुळे सैन्याला ही कारवाई करता आली. सहाजिकच मोदी सरकारला याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला आहे. या राजकारणाला आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे.