दाऊद, हाफीजच्या प्रत्यार्पणाचा एकही प्रस्ताव नाही
By Admin | Updated: May 15, 2017 00:17 IST2017-05-15T00:17:04+5:302017-05-15T00:17:04+5:30
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम किंवा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी कोणत्याही

दाऊद, हाफीजच्या प्रत्यार्पणाचा एकही प्रस्ताव नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम किंवा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी कोणत्याही तपासणी संस्थेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दिली आहे.
एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती विचारली होती. परराष्ट्र मंत्रालयाला विचारणा करण्यात आली होती की, हाफीज सईद आणि दाऊद इब्राहिम यांच्या प्रत्यार्पणाबाबत आणि त्यांना भारतात आणण्याबाबत काय कार्यवाही करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर १९९३ च्या मुंबई बॉॅम्बस्फोटाचा आरोप आहे. १९९३ च्या स्फोटात २६० जण ठार झाले होते, तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. या स्फोटानंतर दाऊद देश सोडून पळून गेला होता. तो सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
लष्कर -ए- तोयबाचा म्होरक्या असलेल्या हाफीज सईदवर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट केल्याचा आरोप आहे.