गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 13:56 IST2017-09-01T02:37:54+5:302017-09-01T13:56:28+5:30

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली.

'Railway' almost sure about Gadkari | गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित

गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित

हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते.
कलराज मिश्रा यांनीही शाह यांची भेट घेतली. त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यांना राज्यपाल म्हणून पाठवले जाईल, असे कळते. राज्यपालपदाच्या आठ जागा रिक्त असून, लालजी टंडन, विजयकुमार मल्होत्रा व सी. पी. ठाकूर यांना राज्यपाल केले जाऊ शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही राज्यमंत्र्यांना े जबाबदारीतून मोकळे करू इच्छितात. उमा भारती, राधा मोहन सिंह यांनी मोदी यांना निराश केल्यामुळे मंत्रालयांची फेररचना होऊ शकेल.
गडकरी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी जाणार हे जवळपास निश्चित आहे. सुरेश प्रभू यांना कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा फटका दोन डझन मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Railway' almost sure about Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.