राहुल गांधींचे प्रतिज्ञापत्र वैध; आक्षेप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:10 IST2019-04-23T06:09:48+5:302019-04-23T06:10:11+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील काही विधानांच्या खरेपणाबद्दल घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राम मनोहर शर्मा यांनी फेटाळले

Rahul Gandhi's affidavit is valid; The objection rejected | राहुल गांधींचे प्रतिज्ञापत्र वैध; आक्षेप फेटाळले

राहुल गांधींचे प्रतिज्ञापत्र वैध; आक्षेप फेटाळले

अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील काही विधानांच्या खरेपणाबद्दल घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राम मनोहर शर्मा यांनी सोमवारी फेटाळले व गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे घोषित केले.

अमेठीमधील चार व दिल्लीतील एका नागरिकाने हे आक्षेप घेतल्यानंतर शर्मा यांनी गांधी यांच्या अर्जाची विशेष छाननी व सुनावणी ठेवली होती. ती झाल्यानंतर वरील निर्णय जाहीर करण्यात आला. तो मान्य नसेल, तर निवडणूक उरकल्यानंतर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणे एवढाच पर्याय तक्रारदारांना उपलब्ध आहे.

 

Web Title: Rahul Gandhi's affidavit is valid; The objection rejected