आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:07 PM2024-02-08T15:07:40+5:302024-02-08T15:08:57+5:30

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

Pinarayi Vijayan Protest in Delhi: First Karnataka, now Kerala; Chief Minister's protest against the Center in Delhi, the reason..? | आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

Pinarayi Vijayan Protest in Delhi: दक्षिणेत राज्ये अनेकदा केंद्र सरकारवर अन्याय केल्याचा आरोप करत असतात. आता परत एकदा दक्षिण vs उत्तर वाद सुरू झाला आहे. कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन निदर्शने केली असून, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्यांचे प्रमुख राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी आले आहेत. बुधवारी (7 फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या सर्व आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांसह निषेध करण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आता गुरुवारी (8 फेब्रुवारी) केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आपल्या आमदार आणि खासदारांसह दिल्लीत आहेत. दोन्ही राज्यांच्या आंदोलनाचे कारण एकच आहे. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांशी आर्थिक भेदभाव करत असल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी केला.

केंद्राविरोधात निषेध नोदवण्यासाठी बुधवारी कर्नाटक तर गुरुवारी केरळचे सत्ताधारी आमदार एकत्र आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असून, आहे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना केंद्राविरोधातील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार अनुदान नाकारुन राज्याच्या आर्थिक लाभात कपात करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, आंदोलनाचा उद्देश केवळ केरळच नाही तर सर्व राज्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे आहे, असेही ते म्हणाले. 

दक्षिणेतील तीन राज्यांचा केंद्राला विरोध
कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विरोध करत असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव कर असून, राज्य सरकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Pinarayi Vijayan Protest in Delhi: First Karnataka, now Kerala; Chief Minister's protest against the Center in Delhi, the reason..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.