इंग्रजांपेक्षाही मोदी सरकार जुलमी - अण्णा
By Admin | Updated: February 24, 2015 04:36 IST2015-02-24T04:36:42+5:302015-02-24T04:36:42+5:30
भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे मोदी सरकार इंग्रजी राजवटीपेक्षाही अधिक जुलमी असून, या सरकारमुळे सर्वसामान्य जनतेचे नव्हेतर उद्योगपतींचे ‘अच्छे दिन’ आले आहेत

इंग्रजांपेक्षाही मोदी सरकार जुलमी - अण्णा
नवी दिल्ली : भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे मोदी सरकार इंग्रजी राजवटीपेक्षाही अधिक जुलमी असून, या सरकारमुळे सर्वसामान्य जनतेचे नव्हेतर उद्योगपतींचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. भूसंपादन अध्यादेश मागे न घेतल्यास देशभर पदयात्रा आणि जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भूसंपादन कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक हजारे आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर दोन दिवसीय आंदोलन सोमवारी सुरू झाले. सरकारविरोधी घोषणा देत देशभरातून आलेले शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.