एमआयडीसी पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:34+5:302016-02-23T00:03:34+5:30
जळगाव : जानेवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी २१ फेबु्रवारीला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या
ज गाव : जानेवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी २१ फेबु्रवारीला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शाकीर खॉँ शब्बीर खॉँ (वय २२, रा.इस्लामपुरा, भवानीपेठ, जळगाव) असे त्या संशयिताचे नाव आहे. १२ जानेवारी २०१६ रोजी विश्वकर्मा नगरात त्याने चरणदास हरचंद गुळवे यांच्या मालकीच्या ऑटोरिक्षाचे दोन टायर व एक स्टेपनी चोरून नेली होती. याप्रकरणी चरणदास गुळवे यांच्या फिर्यादीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला २१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून पाच स्टेपनी व टायर रिकव्हर झाले आहेत. विश्वकर्मा नगरात चोरी केल्याची कबुली शाकीरने दिल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुर्हाडे यांनी दिली.