लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा

By Admin | Updated: July 7, 2017 11:35 IST2017-07-07T08:10:39+5:302017-07-07T11:35:11+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

Laloo Prasad Yadav is in Goa! CBI files complaint | लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा

लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली,  दि. 7 - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने शुक्रवारी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या बारा ठिकाणांवर छापे मारीची कारवाई केली. 
 
लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान  देशाचे रेल्वेमंत्री होते. 
 
सीबीआयच्या एफआयआरमध्ये लालूंची पत्नी, राबडी देवी, त्यांचा मुलगा तेजस्वी, आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पीके गोयल आणि सरला गुप्ता यांची नावे आहेत. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्टयावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली असा आरोप सीबीआयने केला आहे. दरम्यान सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा 10 सर्क्युलर रोड निवासस्थानी बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे. 
 
आणखी वाचा 
अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट
लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव
...आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवला होता उदारपणा
 
शुक्रवारी सकाळी तपास पथकाने लालूंच्या निवासस्थानासह दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुरगाव येथे छापेमारीची कारवाई केली. रेल्वेची दोन हॉटेल्स खासगी कंपनीकडे हस्तांतरीत करण्याच्या बारा वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. त्यावेळी लालू रेल्वेमंत्री होते. या हॉटेल्सच्या मोबदल्यात त्या खासगी कंपनीने पाटणा येथील दोन एकर जमीन लालूंना दिल्याचा आरोप आहे. 
 
काय म्हणाले बाबा रामदेव
हिंदू लोकंही मांस खातात, या लालू प्रसाद यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने जोरदार टीका केलेली असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. " असे वक्तव्य करणारे लालू यादव हे कृष्णाचे नव्हे तर कंसाचे वंशज आहेत" अशी टीका योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे. 
 
लालू यादव यांनी गोमांसाबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांनी यदुवंशाच्या नावाला काळिमा फासला आहे, अशी व्यक्ती कंसाची वंशज असू शकते. जनता त्यांना योग्य धडा शिकवेल" अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी लालू यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
 
 
 

Web Title: Laloo Prasad Yadav is in Goa! CBI files complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.