जेएनयू प्रकरण : कन्हैया कुमारसह ६ जणांवर दंडात्मक कारवाई
By Admin | Updated: April 25, 2016 18:23 IST2016-04-25T18:21:04+5:302016-04-25T18:23:50+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर १०,००० रुपयांचा दंड, तर उमर खालिदला २०,००० हजार रुपयांचा दंड आणि एका सत्रा परिक्षेसाठीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

जेएनयू प्रकरण : कन्हैया कुमारसह ६ जणांवर दंडात्मक कारवाई
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर १०,००० रुपयांचा दंड, तर उमर खालिदला २०,००० हजार रुपयांचा दंड आणि एका सत्रा परिक्षेसाठीसाठी निलंबित करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळानंतर जेएनयू प्रशासनाकडून कन्हैया कुमार, उमरसह अन्य तिघांवर कारवाई कारवाई करत ठोस पाऊल उचलले आहे.
दरम्यान, १५ मार्च राजी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली होती. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, पीएचडीचा अभ्यास करणारा उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्यचा समावेश होता.
जेएनयूचा माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आषुतोष याला देखील २०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आषुतोष याला जेएनयूमधील हॉस्टेलमध्ये एका वर्षासाठी येण्या, बंदी देखील घालण्यात आली आहे. कन्हैया कुमारसह जेएनयूमधील एबीव्हीपीचा नेता सौरभ शर्माला देखील १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उमर खालिदला एक सत्रासाठी त्याचा सहकारी मुजीबला दोन सत्रासाठी बंदी घालण्यात आली. तर आनिर्बान भट्टाचार्यला १५ जुलैपर्यंत जेएनयूमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. ५ वर्षापर्यंत जेएनयूमधील कोणत्याच कोर्ससाठी आनिर्बान भट्टाचार्यला प्रवेश घेता येणार नाही.
9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारसहित उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.