हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:21 PM2019-01-28T13:21:10+5:302019-01-28T13:21:54+5:30
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी घडली.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये भारतीय हवाई दलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे जॅग्वार विमानाने गोरखपूर येथील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर 10 मिनिटानंतर पायलटचा संपर्क तुटला आणि येथील कुशीनगरमधील हेतिमपूर गावातील शेतात हे विमान कोसळले. दरम्यान, विमान कोसळण्यापूर्वी पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्याने सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. तसेच, पोलीस दाखल झाले आहेत.
Uttar Pradesh: Latest visuals from Kushinagar where an Indian Air Force Jaguar fighter plane crashed today, the pilot managed to eject safely. A court of inquiry has been ordered to investigate the accident. pic.twitter.com/MZxgwjWHrS
— ANI (@ANI) January 28, 2019
Uttar Pradesh: Visuals from Kushinagar where an Indian Air Force Jaguar fighter plane crashed today, the pilot managed to eject safely. A court of Inquiry has been ordered to investigate the accident. pic.twitter.com/fZtAtJcd3U
— ANI (@ANI) January 28, 2019
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील जॅग्वार हे एक प्रमुख लढाऊ विमान आहे.
An Indian Air Force Jaguar fighter plane crashes in Kushinagar in Uttar Pradesh. More details awaited. pic.twitter.com/6ZIlxssenS
— ANI (@ANI) January 28, 2019