५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 16:00 IST2019-05-02T14:10:58+5:302019-05-02T16:00:13+5:30

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

cbse results 2019 topper hansika shukla want to be ifs officer and do sociology all about her? | ५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?

५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?

नवी दिल्लीः सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत हंसिका शुक्ला पहिली आहे. हंसिकाबरोबरच करिश्मा अरोरा ही विद्यार्थिनीही परीक्षेत टॉपर ठरली आहे. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. हंसिका शुक्लाला पुढे जाऊन आयएफएस ऑफिसर व्हायचं आहे. आयएफएस अधिकारी हा देशाच्या बाह्य व्यवहारांशी निगडीत असतो, तो इतर देशांशी कूटनीती, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध सलोख्याचे राखण्याचं काम करतो.

हंसिकाला समाजशास्त्र विषय फार आवडतो. तिला पुढे अजूनही शिकायचं आहेत. तिची आई गाझियाबादमधील विद्यावती कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयाची प्राध्यापक आहे. तिचे वडील राज्यसभेत सेक्रेटरीपदावर कार्यरत आहेत. हंसिका सांगते, माझे वडील फार कडक स्वभावाचे नाहीत. परंतु आई शिस्तप्रिय आणि कडक आहे. हंसिका ही नियमित अभ्यास करत नसल्याचीही खंत तिनं व्यक्त केली आहे. कोणतंही कोचिंग क्लासला न जाता हे देदीप्यमान यश मिळवल्याचं तिनं आवर्जून सांगितलं आहे.

मी सर्वच विषयांकडे विशेष लक्ष देत होती. सर्वच विषयांना ठरवलेला वेळ देण्याचा प्रयत्न करत होती. तिला इंग्रजी विषय सोडल्यास प्रत्येक विषयात 100 गुण मिळाले आहेत. तिला फक्त इंग्रजीतच 99 गुण मिळाले आहेत. तिला संगीताची प्रचंड आवड आहे. म्हणूनच त्यांनी 12वीत म्युझिकला विशेष प्राधान्य दिलं आहे. पुढे जाऊन तिला समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा आहे. 

Web Title: cbse results 2019 topper hansika shukla want to be ifs officer and do sociology all about her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.