भाजपाची दिल्लीत उद्यापासून कार्यकारिणी, आर्थिक परिस्थिती आणि निवडणुका यांवर होणार मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:40 IST2017-09-23T23:39:34+5:302017-09-23T23:40:06+5:30
पंतप्रधान मोदी सरकारवर देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप होत असताना, भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत २४ व २५ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होणार आहे.

भाजपाची दिल्लीत उद्यापासून कार्यकारिणी, आर्थिक परिस्थिती आणि निवडणुका यांवर होणार मंथन
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सरकारवर देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप होत असताना, भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत २४ व २५ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होणार आहे.
आर्थिक परिस्थिती व गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका यांवरही मंथन होणार आहे. गुजरात भाजपाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. जे ठराव तिथे होतील, त्यापैकी आर्थिक प्रस्तावात नोटाबंदी आणि जीएसटी अर्थव्यवस्थेसाठी कशाप्रकारे हिताचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न होईल. महिला आरक्षण आणि रोहिंग्या शरणार्थी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. राम माधव आणि विनय सहस्त्रबुद्धे राजकीय प्रस्ताव तयार करत आहेत.