एअर इंडियाचा मान्सून धमाका, 706 रुपयांत विमान प्रवास
By Admin | Updated: June 18, 2017 16:35 IST2017-06-18T16:35:39+5:302017-06-18T16:35:59+5:30
टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे विमान कंपन्यांमध्येही एकाहून एक सरस ऑफर देण्याची शर्यत सुरू आहे. आता एअर इंडियानंही मान्सून ऑफर आणली असून

एअर इंडियाचा मान्सून धमाका, 706 रुपयांत विमान प्रवास
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे विमान कंपन्यांमध्येही एकाहून एक सरस ऑफर देण्याची शर्यत सुरू आहे. आता एअर इंडियानंही मान्सून ऑफर आणली असून याद्वारे देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट अवघ्या 706 रुपयांपासून मिळणार आहे. एअर इंडियानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडल आणि वेबसाइटवरून याबाबत माहिती दिली आहे.
एअर इंडियाची ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. त्यासाठी 17 जून ते 21 जून दरम्यान तिकीट बुक करावं लागणार आहे. एअर इंडियाचं बुकिंग ऑफिस, अधिकृत ट्रॅव्हल्स एजंट वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
मात्र, ठरावीक शहरांमधील प्रवासासाठीच ही ऑफर उपलब्ध असणार आहे. याबाबतची माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यापुर्वी प्रवाशांना आपलव्याकडे खेचण्यासाठी विस्तारा, स्पाइसजेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनीही स्वस्त विमान प्रवासाची ऑफर आणली आहे.