घुणकीच्या सर्जेराव मोरे यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: February 3, 2017 00:19 IST2017-02-03T00:19:51+5:302017-02-03T00:19:51+5:30

पेठवडगाव : पुणे विभागाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार घुणकीच्या रसिक रंजन वाचनालयाचे ग्रंथपाल सर्जेराव तुकाराम मोरे यांना पुणे विभागाच्या सहायक ग्रंथालय संचालिका उज्ज्वलाताई लोंढे यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप होते.

Adarsh ​​Librarian Award for Sarjeera More, Ghanki | घुणकीच्या सर्जेराव मोरे यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

घुणकीच्या सर्जेराव मोरे यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

ठवडगाव : पुणे विभागाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार घुणकीच्या रसिक रंजन वाचनालयाचे ग्रंथपाल सर्जेराव तुकाराम मोरे यांना पुणे विभागाच्या सहायक ग्रंथालय संचालिका उज्ज्वलाताई लोंढे यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप होते.
पन्हाळा येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघ यांच्यावतीने आयोजित अधिवेशनात झाले होते. यावेळी हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पन्हाळा नगराध्यक्षा रूपाली धडेल, पुणे विभागाचे अध्यक्ष हिंदुराव पाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी मगदूम, सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, संघाचे सदस्य तात्यासाहेब पाटील, भीमराव पाटील, बाबासाहेब कावळे, वाचनालयाचे उपाध्यक्ष हिंदुराव तेली, कार्यवाह संपतराव पाटील, खजिनदार शंकरराव तेली, संचालक आनंदराव पाटील, धोंडिराम सिद, जयसिंग पाटील, प्रा. तुकाराम खतकर, प्रा. अशोक जाधव, महेश खताळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

फोटो ओळ : कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघ यांच्यावतीने पुणे विभागाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार घुणकीच्या सर्जेराव मोरे यांना प्रदान करताना सहायक ग्रंथालय संचालिका उज्ज्वलाताई लोंढे. यावेळी हिंदुराव पाटील, रूपाली धडेल, तात्यासाहेब पाटील, संपतराव पाटील उपस्थित होते.
फोटो- ०१वडगाव सर्जेराव मोरे पुरस्कार

Web Title: Adarsh ​​Librarian Award for Sarjeera More, Ghanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.