पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आला 14 फूल लांबीचा बोगदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 07:38 PM2017-09-30T19:38:53+5:302017-09-30T19:39:30+5:30
सीमा सुरक्षा दलानं शनिवारी (30 सप्टेंबर ) 14 फूट लांबीचा एका बोगद्याचा पर्दाफाश केला आहे. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले.
श्रीनगर - सीमा सुरक्षा दलानं शनिवारी (30 सप्टेंबर ) 14 फूट लांबीचा एका बोगद्याचा पर्दाफाश केला आहे. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले. यासोबतच अरनिया सेक्टरमध्ये युद्धाच्या तयारीनुसार शस्त्रास्त्रांचा साठाही आढळून आला आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दमानाजवळ विक्रम आणि पटेल चौक्यांदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर दक्षता अभियान राबवण्यात आले. यादरम्यान काही संशयास्पद हालचालीसहीत खोदण्यात आलेला हा बोगदा आढळून आला.
या अभियानादरम्यान सतर्क जवानांनी 14 फूट लांबीच्या बोगद्याचा शोध लावला. यादरम्यान जवानांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील आढळून आला. यावरुन, सशस्त्र घुसखोर होते, ज्यांना फरार होण्यात यश आले, असे संकेत मिळत असल्याचेही अधिका-यांनी सांगितले.
#Visuals of items recovered from tunnel unearthed by BSF in J&K's Arnia Sector. pic.twitter.com/eaAtpVQ4k6
— ANI (@ANI) September 30, 2017
Noticed suspicious movement, surveyed area & found 13-14 ft long tunnel (in Arnia),but its end wasn't open: Ram Awtar IG BSF, Jammu Frontier pic.twitter.com/heZF5LaUYX
— ANI (@ANI) September 30, 2017