दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:36 IST2018-04-03T23:36:09+5:302018-04-03T23:36:09+5:30
सुरगाणा : येथील चिराई घाटात दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला.

दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
सुरगाणा : येथील चिराई घाटात दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. हा अपघात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला चंद्रकांत भागवत पवार (२८, रा. चिंचपाडा (श्रीभुवन) असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्या सोबत असलेला गणपत बुधा बंगाळ (२२), रा. चिंचपाडा हा जखमी झाला आहे. त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे दोघेही दुचाकीने कामानिमित्त अभोणा येथे जात होते. चिराई घाटातील गणपती मंदिरासमोर आले असता समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोच्या (क्र. जीजे २६ टी ८००७) मागच्या बाजूचा चंद्रकांत यांच्या डोक्यास जोरदार फटका लागून त्याचा जागीच मृत्यु झाला. तर गणपत हा जखमी झाला. टेम्पोचालक फरार असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.